Skip to main content
- प्रगल्भता म्हणजे काय ?
- जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
- जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
- जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
- जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
- जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
- तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
- जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
- जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
- जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
- जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
- जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
- जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.
- जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
- जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
- जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आणि शेवटी अती महत्वाचे
- जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता 🌸
Comments
Post a Comment